top of page

Self Help

Self-help is the best help is an old proverb. The term self-help is used in various areas involved in solving problems by oneself or bettering individual strengths and skills. There are many self-help books available for various issues and subjects such as how to gain confidence, how to motivate yourself, how to invest so on and so forth. Self-help in the context of Mental illness is based on the same principle as overcoming an individual’s problems and skills betterment.

 

Self- Help in Mental illness promotes the process of recovery. It helps people with mental illness regain their strengths which get deteriorated because of the illness. It includes finding strategies that will help them to manage day-to-day problems on their own.

Many times, people with mental illness and their family members are not aware of how they can help themselves in addition to the professional care that will be supportive for the process of recovery. Developing such insight about Self- help is one of the important aspects of our support group.

स्वमद

असे म्हणतात ' स्वमदत हीच खरी मदत'. स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवणं किंवा स्वतःची कौशल्ये, क्षमता वाढवणं यात 'स्वमदत' संकल्पनेचा वापर होतांना दिसतो. 'आत्मविश्वास कसा वाढवावा?', 'स्वतःला प्रेरित कसे करावे?', 'गुंतवणूक कशी करावी?', इ विविध प्रश्नांवर आणि विषयांवर , स्वतःला मदत कशी करावी हे सांगणारी पुस्तके उपलब्ध आहेत.  मानसिक आजारासंबंधीची, स्वतःच्या प्रश्नांवर मात करण्यासाठी, त्यासाठीची कौशल्ये विकसित करण्यासाठीची 'स्वमदत' संकल्पनाही याच तत्वावर आधारलेली आहे.

मानसिक आजारातून बाहेर पडण्यासाठी 'स्वमदत' हातभार लावते. मानसिक आजारामुळे निर्माण झालेली अक्षमता दूर होऊन सक्षम होण्यासाठी 'स्वमदती'चा उपयोग होतो. त्यात दैनंदिन जीवनात येणाऱ्या प्रश्नांचे स्वतःचे स्वतः व्यवस्थापन करण्यासाठी धोरणे कशी आखावी हे ही येते.

बऱ्याचवेळा मानसिक आजारी व्यक्ती (शुभार्थी) आणि त्याचे कुटुंबीय (शुभंकर) यांना, सुधारणेच्या प्रवासात, तज्ज्ञांच्या उपचारांना सहाय्यक होईल अशी मदत, आपण स्वतःच कशी करू शकतो याविषयी कल्पना नसते. अशी 'स्वमदत' करण्या विषयीची जाण विकसित करणे हा 'स्वमदत आधार गटा'चा (self-help support group) अनेक हेतूंपैकी एक महत्वाचा हेतू आहे.

Contact Us

Eklavya Foundation for Mental Health

Shaniwar Peth, Pune, INDIA

eklavyafoundationmh@gmail.com

 

+ 91 9096827953 

+ 91 9225575432

© Eklavya Foundation for Mental Health 2024

  • Instagram
  • Facebook
  • LinkedIn
  • YouTube
bottom of page