top of page

Recovery tools

Dr. Abraham Low was a well-known American psychiatrist, who was a founder of Recovery Inc. According to him, adult life is driven and guided by WILL. Therefore, through his book ‘Mental Health through Will Training’, he emphasizes on Self-Help by persons with mental illness (Shubharthi), using his recovery techniques.

After the medical treatment, symptoms of Shubharthi subside and mental health gets restored to a significant extent. Still Shubharthi faces residual symptoms such as restlessness, tenseness, preoccupation, lack of concentration, etc.  Shubharthi becomes self-conscious and introspective. He/she experiences difficulty in sleeping, fatigue and the haunting fear of relapse. Shubharthi describes these residual symptoms as ‘threatening’ sensations, ‘intolerable’ feelings, ‘uncontrollable’ impulses and obsessive ‘unbearable’ thoughts. These adjectives are expressive of Shubharthi’s defeatism.

For Shubharthi to recover, one needs to convince him/her that the sensations can be endured, impulses can be controlled and obsessions can be checked.  Mental Health professional tries his best to convince Shubharthi that his/her feelings and thoughts are not completely realistic, but Shubharthi relies on his own feelings and thoughts and assumes that it is a reality. If Shubharthi chooses to go with his/her self-diagnosis without trusting Mental Health Professional, he/she deprives himself /herself of appropriate treatment. Dr. Low calls this distrust as sabotage. If other Shubharthi, who has overcome such situation and got recovered from mental illness, explains it to Shubharthi who is facing such situation, Shubharthi gets convinced. This happens in Self Help Group discussions. Therefore Self Help Group concept is emphasized by Dr. Low.

If Shubharthis are to help each other, they must be instructed to use specific vocabulary/language, which is clear and without ambiguity. This specific language avoids the fatalistic implications of the language. Eg. If Shubharthi uses adjectives as mentioned earlier ‘threatening’, ‘unbearable’, etc. other Shubharthi may get feeling of fear and will disrupt the purpose. Therefore, Recovery language, Recovery Principles, Recovery Method came in to existence.

Recovery language keeps check on Shubharthi’s exaggerations while discussing distressful situation. It also checks self-diagnosing and sabotaging. In Self Help Group, Shubharthi is trained to spot (identify) the inconsistencies and fallacies of his/her language. Basic recovery tools are ‘Change the thoughts’ and ‘Command muscles’. These root tools provide the answer to the question ‘What to do’, in any situation that causes distress. At the highest level, ‘What to do’ is supervised by one’s WILL. One’s WILL accepts or rejects thoughts and stops or releases instructions to the muscles. WILL TRAINING is a process of teaching one’s own WILL  to say ‘YES’ to healthy thoughts and impulses and ‘NO’ to those that are not.

Recovery tools given below are realistic and rational statements which change the thought process of Shubharthi. Shubharthi uses his/her WILL POWER to get these healthy thoughts in to the action by instructing muscles to act accordingly, resulting in control and calmness of mind.

रिकव्हरी मदततत्वांविषयी

डॉ अब्राहम लो हे अमेरिकेतले नावाजलेले मनोविकार तज्ञ होते. त्यांनी Recovery Inc. ही संस्था स्थापन केली. त्यांच्या विचारसरणीनुसार माणूस आपल्या इच्छाशक्तीच्या नुसार त्याच्या आयुष्याला वळण देतो. त्यांनी आपल्या ‘Mental Health through Will Training’ या पुस्तकात, त्यांच्या रिकव्हरी मदततत्वांच्या आधारे, मानसिक आजारी व्यक्ती (शुभार्थी) स्वतःला मदत करू शकते, स्वतःच्या इच्छाशक्तीला प्रशिक्षित करू शकते व आजारावर मात करू शकते असे आग्रहाने प्रतिपादन केले आहे.

आजारावर उपचार घेतल्यावर, आजाराची महत्वाची (बाह्यलक्षणे) दिसेनाशी होतात. मानसिक आजार ताब्यात यायला सुरवात होते. परंतु शुभार्थीला आंतरिक लक्षणे जसे अस्वस्थता, ताण, विचारआवर्तात गुंतलेले राहणे, लक्ष एकाग्र न होणे, इ. जाणवत असतात. शुभार्थी स्वतःविषयी जागरूक होतो व आत्मनिरीक्षणात गुंततो. त्याला/तिला झोपेचे त्रास, थकवा आणि आजाराची पुनरावृत्ती होण्याची अत्यंत भीती जाणवत असते. त्याविषयी बोलतांना शुभार्थी ‘थरकाप उडवणाऱ्या’ संवेदना, ‘असह्य’ भावना, ‘अनावर’ आवेग, मन व्यापून टाकणारे ‘नकोसे’ विचार असे वर्णन करतो. ही सर्व विशेषणे शुभार्थीची हतबलता, पराभूत मनोवृत्ती दर्शवतात.

शुभार्थी बरा होण्यासाठी त्याला/तिला कोणीतरी, संवेद्नांबरोबर तगता येते, आवेगांवर नियंत्रण आणता येते, मन व्यापून टाकणारे नकोसे विचार कमी करता येतात असे पटवून द्यायला हवे. मानसिक आरोग्य तज्ञ, शुभार्थीला स्वतःला जाणवणाऱ्या संवेदना तसेच त्याच्या मनात येणारे विचार पूर्णपणे खरे नसतात हे पटवून द्यायचा प्रयत्न करतो, परंतु शुभार्थी त्याला स्वतःला वाटणाऱ्या भावना व विचारांनाच खरे मानतो.  शुभार्थी, तज्ञाच्या म्हणण्यावर विश्वास न ठेवता, स्वतःच स्वतःबद्दल केलेल्या निदानाबद्दल आग्रही राहिला तर तो/ती योग्य उपचारांपासून वंचित रहातो. या अविश्वासाला डॉ. लो ‘sabotage’ म्हणतात. एखाद्या अन्य शुभार्थीने, जो अशा परिस्थितीमधून जाऊन बरा झालाय, त्याने या परिस्थितीमधून जात असलेल्या शुभार्थीला आपला  अनुभव सांगून हे विचार  समजावून सांगितले तर शुभार्थीला ते पटतात. हे स्व-मदत गटातल्या चर्चेत घडू शकते.  म्हणून डॉ. लो स्व-मदत गट या संकल्पनेवर भर देतात.

शुभार्थी जर एकमेकांना मदत करणार असतील तर दुसऱ्याच्या बोलण्याचा योग्य रीतीने अर्थ लावण्यासाठी आणि अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी, त्यांना ठराविक शब्द/भाषा, जी गोंधळवणारी नाही अशी शिकवली पाहिजे. उदा. एका शुभार्थीने ‘थरकाप उडवणारे’, ‘असह्य’ अशी विशेषणे वापरून परिस्थिती कथन केली तर दुसऱ्या शुभार्थीला भीती वाटून, मदत होण्याचा उद्देश फोल ठरेल. म्हणूनच रिकव्हरीची भाषा, रिकव्हरीची मदततत्वे, रिकव्हरी पद्धत अस्तित्वात आली.

अस्वस्थ व्हायला लावणारा प्रसंग सांगताना शुभार्थीच्या अतिशयोक्तीवर रिकव्हरीची भाषा नियंत्रण ठेवते. ती शुभार्थीला, स्वतःच्या परिस्थितीचे स्वतः निदान कारणे व त्यामुळे योग्य उपचारावाचून स्वतःला वंचित ठेवणे या पासून रोखते. स्वमदत गटात, शुभार्थीला त्याच्या भाषेतल्या(विचारातल्या) विसंगती, खोटेपणा नेमकेपणाने शोधून काढायला शिकवले जाते. ‘विचारांमधे बदल’ आणि ‘स्नायूंवर नियंत्रण’ ही दोन मुख्य रिकव्हरी मदततत्वे आहेत. ही मूळ मदततत्वे कुठल्याही अस्वस्थ वाटायला लावणाऱ्या प्रसंगात, ‘मी काय करू’ या प्रश्नाला उत्तर देतात. ‘मी काय करू’ ला मिळालेले उत्तरावर इच्छाशक्ती(WILL POWER) अंतिम निर्णय देते. इच्छाशक्ती विचाराचा स्वीकार किंवा अव्हेर(नाकारणे) करते व त्यानुसार स्नायूंना कृती करण्याची किंवा कृती न करण्याची आज्ञा देते. आरोग्यासाठी योग्य विचार व आवेगांना(कृती करण्यासाठी)  ‘हो’ म्हणजेच हिरवा दिवा दाखवणे आणि अयोग्य विचार व आवेगांना ‘ नाही’ म्हणजेच लाल दिवा दाखवणे हे इच्छाशक्तीला शिकवणे म्हणजेच ‘इच्छाशक्ती प्रशिक्षण (Will Training)’.

खाली दिलेली मदततत्वे म्हणजे वास्तवाला धरून व विवेकी विचार असलेली वाक्ये आहेत, जी वारंवार वापरून शुभार्थीच्या विचारप्रक्रियेमधे बदल घडतो. शुभार्थी आपल्या इच्छाशक्तीच्या वापर करून आरोग्यदायी विचारांना, आपल्या स्नायुंना आज्ञा देऊन कृतीमध्ये आणतो. असे करण्याने शुभार्थीला स्वतःवर नियंत्रण आणि मानसिक शांतता मिळते.

What is recovery method poster
bottom of page