Community Mental Health
In simple terms, community mental health refers to care and services provided to persons with mental illness and their family members in the community setting. After the movement of deinstitutionalization, community mental health services emerged to provide support and care to persons with mental illness in the community rather than being admitted to an institution. It includes services such as daycare centers, halfway homes, psychiatric wards, Self-help groups, etc.
Community mental health services mainly focus on rehabilitation services and the protection of the human rights of persons with mental illness. These services help in the restoration of the mental, physical and social well-being of the individual.
Community mental health has its root in the inclusion of persons with mental illness in society. However, because of the stigma and misconceptions regarding mental illness, the participation of the community is less.
Community mental health services in India took an initiative to participate the family members of persons with mental illness in the treatment. As every report on mental health in India suggests that there is a lack of mental health professionals. Hence, it is important to engage members of the community in community mental health services provided to persons with mental illness and their family members. Moreover, as current data suggest the prevalence of mental health issues is on expand hence it is also necessary to include programs in the community mental health that will address this issue.
Hence at Eklavya, we prefer the activities of conducting support group meetings, conducting awareness and stigma removal programs by the people who are either recovered persons from mental illness or the family members of persons with mental illness or lay volunteers who are interested to work in the field.
सामुदायिक मानसिक स्वास्थ्य
अगदी साध्या शब्दात सांगायचे झाले तर 'समाजात राहून मानसिक स्वास्थ्य' म्हणजे मानसिक आजारी व्यक्ती आणि तिच्या कुटुंबियांची नेहमीच्या समाजव्यवस्थेतच घेतली जाणारी काळजी तसेच त्यांना मिळणाऱ्या सेवा.
मानसिक आजारी व्यक्तींची काळजी घेणाऱ्या संस्थात्मक स्वरूपा विरोधी चळवळ झाल्यानंतर, त्यांना संस्थेमधे दाखल न करता समाजात राहून मानसिक आरोग्य सेवा देण्याऱ्या, त्यांची काळजी घेणाऱ्या व्यवस्था अस्तित्वात आल्या. अशा व्यवस्था म्हणजे मानसिक आजारी व्यक्तींची दिवसभर काळजी घेणारी केंद्रे, घरासमान काही सेवा-सुविधा देणारी घरे, नेहमीच्या रुग्णालयातील मनोविकार प्रभाग, स्वमदत गट, इ. होत.
समाजात राहून मिळणाऱ्या मानसिक आरोग्य सेवांमधे मुख्यतः पुनर्वसन सेवा आणि मानसिक आजारी व्यक्तींच्या मानवी हक्कांचे संरक्षण करणे यावर लक्ष दिले जाते.
भारतात समाजात राहून दिल्या जाणाऱ्या मानसिक आरोग्य सेवेने मानसिक आजारी व्यक्तीच्या कुटुंबियांनाही उपचारांमध्ये सामील करून घेण्यात पुढाकार घेतला.
मानसिक आजारी व्यक्तींना समाजात सामावून घेणे ही कल्पना समाजात राहून दिल्या जाणाऱ्या मानसिक आरोग्य सेवा व्यवस्थेच्या मुळाशी आहे. परंतु मानसिक आजारासंबंधी समाजात असणाऱ्या गैरसमजुती तसेच त्याविषयी असणारी कलंक भावना यामुळे या व्यवस्थेत समाजातून होणारा सहभाग कमी आहे.
म्हणूनच 'एकलव्य' मधे आम्ही म्हणजेच मानसिक आजारातून बऱ्या झालेल्या व्यक्ती, मानसिक आजारी व्यक्तींचे कुटुंबातील सदस्य, मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेले स्वयंसेवक असे सगळे मिळून आधार गटांच्या सभा, मानसिक आरोग्याविषयी जागृती, मानसिक आजार कलंक निर्मूलन इ. कार्यक्रम प्रामुख्याने घडवून आणतो.