About
Due to many reasons, persons with mental illness and their relatives become isolated from society. Persons with mental illness and their family members have to suffer because of lack of knowledge, misbeliefs, and stigma. There is no other support or guidance available to them apart from the help from doctors.
For this very reason, in 1997 Eklavya self-help group was started with an aim to have a space for persons with mental illness and their family members.
Persons with mental illness and their family members participate in the self-help group and recovered patients, family members or volunteers guide this group work as coordinators. Persons with similar experiences share their experiences in the group. By doing so, they give hope to others. Along with that they also share coping skills by which one can control his/her symptoms.
Such groups do not have any professionals involved but this type of sharing is very helpful. In India, there are some support groups for a few physical illnesses. In other countries, there are many groups for mental illnesses.
Since 1997, the group has seen many transitions in terms of the number of members, meeting places, etc. Now the group is much more stable. There is fixed pattern regarding how the support group meetings would be conducted, the roles and responsibilities of volunteers and members are decided. Many people with mental illness and their family members are benefited from the Eklavya Self-help group.
Eklavya Foundation was formally founded in September 2021. The foundation mainly focuses on 3 goals, conducting support group meetings would be conducted, the roles and responsibilities of volunteers and members are decided. Many people with mental illness and their family members are benefited from the Eklavya Self-help group.
Following are the ways to fulfill the foundation’s goals:
-
Spreading awareness in various ways for mental health and mental illness.
-
To help persons with mental illness or their caregivers to start support groups, to inspire them to do self-help and spread awareness about the support group.
-
To eradicate stigma about mental illness from society, spreading awareness for different elements of society. We are conducting speeches, discussion forums, and exhibitions to reach people.
-
To fulfill the above goal, use traditional as well as digital media and develop various programs for it.
-
Arrange Online and offline programs for awareness, and stigma removal for different age groups and occupations.
-
To create material and booklet about Awareness, stigma eradication, self-help support group, and mental health.
-
Encourage people in Pune and other areas to start a support group for people with mental illness and their caregivers. Provide technical knowledge to do so.
-
Share and receive information and other things with the institution which are interested in the mental health program.
-
Availing the internship facility for psychology and other students for practical knowledge.
-
Taking and giving training from professional people or institutions working in this area.
-
Co-operate with other institutions in this area.
Even though our institute is young, we have started various programs. Online Support group meetings are conducted every Wednesday, Thursday, and Saturday. We have organized speeches for colleges in Pune and outside Pune about the stigma around mental illness and awareness.
Students of Psychology from Sir Parshurambhau college are doing an internship with us to gain practical knowledge. In future, we wish to take Awareness programs and stigma eradication program to common people, school and college student and teachers.
Mission
संस्थेची उद्दिष्टे
-
To reduce superstition, misunderstandings and stigma around mental illnesses by creating awareness and by helping to create a positive inclusive attitude in society.
-
To start more and more self- help groups in various places for persons with mental illness and their family members.
-
मानसिक आजारांबद्दल असलेला समाजाचा कलंकित दृष्टिकोन, गैरसमज व अंधविश्वास याबद्दल जाणीवजागृती करून समाजाची निकोप व निरोगी आरोग्याकडे वाटचाल होण्यास प्रयत्न करणे.
-
स्वतःच स्वतःला मदत करण्यासाठी मानसिक आजारी व्यक्ती आणि कुटुंबीयांसाठी विविध ठिकाणी एकलव्य स्वमदत गट सुरू करणे.
Vision
संस्थेचे ध्येय
To create an informed, empowered, and enabled society by removing the stigma around mental illness.
मानसिक आजारांबद्दलचा कलंक दूर होऊन डोळस आणि सक्षम समाज तयार करणे.
आमच्याबद्दल थोडसं
आपल्या समाजामध्ये मानसिक आजारी व्यक्ती आणि कुटुंबीय हे विविध कारणामुळे एकटे पडलेले असतात. माहिती, अज्ञान, गैरसमज, कलंक भाव अशा अनेक गोष्टींना मानसिक आजारी व्यक्ती व कुटुंबीयांना सामोरे जावे लागते. तसेच डॉक्टरांच्या मदती व्यतिरिक्त अन्य कोणताही आधार /मार्गदर्शन रुग्ण व कुटुंबीयांना समाजामध्ये उपलब्ध होत नाही.
याच कारणासाठी रुग्ण व कुटुंबीयांचा गट असावा या हेतूने १९९७ साली एकलव्य स्वमदत गटाची सुरुवात झाली.
स्वमदत गटामध्ये रुग्ण व कुटुंबीय भाग घेत असतात आणि बरे झालेले रुग्ण कुटुंबीय किंवा स्वयंसेवक अशा गटाला मार्गदर्शन करतात, समन्वयक म्हणून काम करतात . समान अनुभव असणार्या अशा व्यक्ती स्वत:चे अनुभव गटामध्ये शेअर करतात. इतरांना आशा दाखवतात तसेच आजाराशी जुळवून घेण्यासाठी कोपिंग स्किल्स एकमेकांबरोबर शेअर करतात.
अशा गटामध्ये कोणीही तज्ञ जरी नसला तरी देखील असे शेअरिंग खूपच उपयुक्त असते. भारतामध्ये काही शारीरिक आजारांसाठी असे स्वमदत गट आहेत. परदेशात देखील मानसिक आजारांसाठी किंवा समस्येसाठी असे विविध गट आहेत.
१९९७ साली स्थापन झालेला हा एकलव्य गट सभासदांची संख्या, मीटिंगची जागा या आणि अन्य प्रकारे स्थित्यंतरे होत आता चांगला स्थिरावला आहे. या स्वमदत गटाची कामाची पद्धत , समन्वयकाची आणि सभासदांची कामाची पद्धत तसेच त्यांनी पाळावायचे नियम आता निश्चित झालेले असून एकलव्य स्वमदत गटाचा अनेक व्यक्तींना लाभ होत आहे .
सप्टेंबर २०२१ मध्ये एकलव्य फाउंडेशन या संस्थेची स्थापना झाली. ही संस्था रुग्ण व कुटुंबीयांसाठी स्वमदत गट चालवणे, समाजामध्ये जनजागृती करणे आणि समाजातील कलंक भाव कमी करणे अश्या ३ प्रमुख उद्दिष्टांसाठी स्थापन झालेली आहे. विविध उपक्रमाद्वारे ही उद्दिष्टे साधण्याचा प्रयत्न केला जातो. ही संस्था पूर्णपणे स्वयंसेवी पद्धतीने चालवली जाते. बरे झालेले रुग्ण, कुटुंबीय आणि स्वयंसेवक या संस्थेचे पदाधिकारी असतात . संस्थेच्या पदाधिकार्यांमधे मानसिक आरोग्य तज्ञ असत नाहीत. परंतु सल्लागार समिती मध्ये मानसिक आरोग्य तज्ञ असतात तसेच वेळोवेळी होणार्या कार्यक्रमांमध्ये व उपक्रमांमध्ये मानसिक तज्ञांचा महत्वाचा सहभाग असतो.
संस्थेची उद्दिष्ट्ये साध्य करायचे मार्ग खालील प्रमाणे…
-
मानसिक आजार आणि मानसिक आरोग्यासंदर्भात विविध मार्गांनी समाजामध्ये जनजागृती करणे
-
मानसिक आजारी व्यक्ती व त्यांचे कुटुंबीय यांना स्वमदत गट स्थापन करण्यास आणि स्व-मदत करण्यास उद्युक्त करणे आणि त्याचा प्रचार-प्रसार करणे.
-
मानसिक आजारांविषयी असलेल्या कलंकाचे निर्मूलन करण्यासाठी समाजातील विविध घटकांचे नवनवीन मार्गांनी प्रबोधन करणे. त्यासाठी व्याख्याने, चर्चासत्रे तसेच प्रदर्शनाद्वारे लोकांपर्यंत पोहोचणे .
-
वरील उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी पारंपारिक व डिजिटल माध्यमांचा वापर करणे तसेच या माध्यमांद्वारे नवनवीन उपक्रम विकसित करणे.
-
विविध वय आणि व्यवसाय गटातील लोकांसाठी जनजागृतीचे आणि मानसिक आजाराविषयी असलेला कलंक दूर करण्यासाठी ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीने कार्यक्रम आयोजित करणे.
-
जनजागृती, कलंक निर्मूलन, स्वमदत गट आणि मानसिक आरोग्याशी संबंधित अन्य विषयांवर पुस्तिका तसेच अन्य प्रबोधन साहित्य तयार करणे.
-
पुण्यामध्ये आणि अन्यत्र मानसिक आजारी व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय यांचे स्वमदत गट स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन देणे, त्याचबरोबर आवश्यक तांत्रिक ज्ञान उपलब्ध करून देणे
-
मानसिक आरोग्य कार्यक्रमात रस असणाऱ्या इतर संस्थांशी सहकार्य करणे तसेच माहिती आणि इतर गोष्टींचे आदान-प्रदान करणे.
-
मानसशास्त्र तसेच इतर विषयातील विद्यार्थ्यांना व्यावहारिक अनुभव घेण्यासाठी इंटर्नशिपची सुविधा उपलब्ध करुन देणे.
-
या विषयात काम कणार्या व्यक्ती आणि संस्थाकडून प्रशिक्षण घेणे आणि देणे.
-
या विषयात काम करणार्या इतर संस्थांशी सहकार्य करणे इत्यादी.
संस्था जरी नुकतीच सुरू झाली असली तरी विविध उपक्रमांना संस्थेने सुरुवात केलेली आहे. दर गुरुवारी आणि शनिवारी संस्थेचा स्व-मदत गट ऑनलाईन पद्धतीने सध्या चालवला जातो. पुण्यातील आणि पुण्याबाहेरील काही महाविद्यालयांमध्ये जनजागृतीसाठी आणि कलंक निर्मूलनासाठी संस्थेच्या सदस्यांची व्याख्याने देखील आयोजित केली गेली होती. त्याव्यतिरिक्त पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील मानसशास्त्र विषयाचे विद्यार्थी व्यावहारिक अनुभव मिळावा म्हणून संस्थेबरोबर इंटर्नशिप करत आहेत. पुढील कालावधीत जनजागृती आणि कलंक निर्मूलन हे दोन्ही उपक्रम सर्वसामान्य नागरिक, शाळा-कॉलेजेस मधील विद्यार्थी तसेच शिक्षक यांच्या पर्यंत पोहोचवण्याचा संस्थेचा मानस आहे.