Eklavya Foundation was established in September 2021. The foundation mainly focuses on 3 goals, conducting support group meetings for person with mental illness and their caregivers, spreading awareness in the general population, and stigma removal. The organization conducts several programs to fulfil these goals. The activities of the organization are conducted on a voluntary basis. Mental health professionals are not involved in the conduct of day to day activities, however, they are actively involved in various programmes and continue to lend their expertise from time to time. The recovered patients, family members and volunteers are the administrators of the organization.
सप्टेंबर २०२१ मध्ये एकलव्य फाउंडेशन या संस्थेची स्थापना झाली. ही संस्था रुग्ण व कुटुंबीयांसाठी स्वमदत गट चालवणे, समाजामध्ये जनजागृती करणे आणि समाजातील कलंक भाव कमी करणे अश्या ३ प्रमुख उद्दिष्टांसाठी स्थापन झालेली आहे. विविध उपक्रमाद्वारे ही उद्दिष्टे साधण्याचा प्रयत्न केला जातो. ही संस्था पूर्णपणे स्वयंसेवी पद्धतीने चालवली जाते. बरे झालेले रुग्ण, कुटुंबीय आणि स्वयंसेवक या संस्थेचे पदाधिकारी असतात . संस्थेच्या पदाधिकार्यांमधे मानसिक आरोग्य तज्ञ असत नाहीत. परंतु सल्लागार समिती मध्ये मानसिक आरोग्य तज्ञ असतात तसेच वेळोवेळी होणार्या कार्यक्रमांमध्ये व उपक्रमांमध्ये मानसिक तज्ञांचा महत्वाचा सहभाग असतो.
Key Areas
Stigma- removal
Persons with mental illness feel that ‘Stigma is harder than the illness itself’. It is assumed that once the awareness is created stigma will vanish. But unfortunately, it is not always so. Therefore, working towards the de-stigmatization is at the core of Eklavya’s activities.
Mental Health Awareness
The general apathy towards mental health disorders at social as well as government level has been a major block in creating a reliable framework for helping persons with mental health disorders. In addition to that, overall mental health has always never been at the forefront of any health-related forums. Eklavya, therefore, focuses on preventive as well as curative aspects of awareness.
Support groups
Most persons with mental illness and their family members are without any support without periodic meetings or consultations with psychiatrists/ treatment providers. Eklavya support groups provide practical information and skills from people with similar issues. These meetings provide opportunities for time-to-time interaction and learning from other group members.
कलंक निर्मूलन
स्टिग्मा म्हणजेच मानसिक आजाराबद्दल असलेला कलंक भाव हा आजारापेक्षा भयंकर आहे असे मानसिक आजारी व्यक्तींना वाटते. जाणीव जागृतीने स्टिग्मा कमी होईल असे गृहीत धरले जाते पण दुर्दैवाने असे होत नाही, म्हणून मानसिक आजाराविषयीचा कलंक भाव दूर करण्यासाठी प्रयत्न करणे हे एकलव्याच्या उद्दिष्टांपैकी महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.
मानसिक आजारांविषयी जनजागृती
सामाजिक तसेच सरकार पातळीवर देखील मानसिक आरोग्याच्या समस्यांबद्दल अनास्था दिसून येते . या असंवेदनशीलतेमुळे मानसिक आजारी व्यक्तींना मदतीच्या दृष्टीने काही ठोस उपाययोजना /आराखडा तयार करण्यात त्यांची अनिच्छाच दिसते . कुठल्याही आरोग्यासंदर्भातल्या सोयी सुविधांचा विचार अमलात आणताना मानसिक आरोग्यासाठी प्राधान्यक्रम दिलेले दिसत नाही . हाच महत्त्वाचा मुद्दा ध्यानात घेऊन एकलव्य फाउंडेशनने प्रतिबंधात्मक तसेच उपचारांसंदर्भात उपाय योजनांची जनसामान्यांना माहिती व्हावी या उद्देशाने जनजागृतीचे कार्यक्रम राबवण्याचे कार्य हाती घेतले आहे .
स्वमदत आधार गट
मानसिक आजारी असलेल्या बऱ्याच शुभार्थी/शुभंकरांना काही आधार नसतो, विविध कारणांनी ते ठराविक कालावधीने मानसोपचार तज्ज्ञांना भेटू शकत नाहीत. एकलव्य आधार गटात समान अनुभवातून गेलेल्या व्यक्तींकडून व्यावहारिक पर्याय, माहिती व कौशल्ये एकमेकांना दिली जातात. आधार गटाच्या सभांमुळे ते इतर सभासदांशी नियमित संवाद साधू शकतात आणि एकमेकांच्या अनुभवातून शिकू शकतात.
The work we do at Eklavya Foundation is based on the following three key areas.
या तीन मुख्य संकल्पना एकलव्य फाउंडेशनच्या कामाच्या गाभ्याशी आहेत.
The World Health Organization defines mental health disorder as the one characterised by a clinically significant disturbance in an individual’s cognition, emotional regulation, or behaviour. It is usually associated with distress or impairment in important areas of functioning.
Self help in Mental illness promotes the process of recovery. It helps people with mental illness regain their strengths which get deteriorated because of the illness. It includes finding strategies that will help them to manage day-to-day problems on their own.
Community Mental Health
Community mental health refers to care and services provided to persons with mental illness and their family members in the community setting.